Download Now Banner

This browser does not support the video element.

तुमसर: शहरातील बोस नगर येथे हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या दोन आरोपींविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल

Tumsar, Bhandara | Sep 9, 2025
तुमसर शहरातील बोस नगर सब्जी मंडी परिसरात दि. 7 सप्टेंबर रोज रविवारला रात्री 10 वा.च्या सुमारास तुमसर पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान हद्दपार करण्यात आलेले आरोपी घनश्याम उर्फ रोशन रमेश भजने व श्याम मनोहर फुलवाणी यांना ताब्यात घेतले. मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी तुमसर यांनी दोन्ही आरोपींना तुमसर पोलीस ठाणे हद्दीतून दि. 4 सप्टेंबर 2025 ला हद्दपार आदेशाचे आदेश दिले होते. परंतु दोन्ही आरोपींनी हद्दपार आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us