विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ शाखा चंद्रपूर तर्फे चंद्रपूर येथील धनोजे कुणबी सभागृहात जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. ग्रंथपालांच्या समस्या मार्गी लावल्याबद्दल विदर्भ माध्यमिक ग्रंथपाल संघटना, नागपूर विभागातर्फे आ. सुधाकर अडबाले यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. सोहळ्याला अध्यक्ष म्हणून आ.सुधाकर अडबाले तर उद्घाटक म्हणून माजी आमदार डायगव्हाणे ऊपस्थीत होते.