सुरक्षिततेच्या दृष्टीने गणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी आज दिनांक २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान शहरातील फरशी भागातून पाहणी करण्यात आली. संवेदनशिल शहर अशी खामगावची ओळख असल्याने पोलीस प्रशासन नेहमीच शहरात गणेशोत्सवादरम्यान चोख पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणूकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते.