तुझ्या पतीवर केलेल्या अंत्यविधीचा खर्च दे, असे म्हणत वाद होऊन वादात जेठ व जेठाणीने दिराणीस बेदम मारहाण केल्याची घटना २८ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. याबाबत गं. भा. आरती आकाश काळे (३०) रा.जिजामाता नगर यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली की, जेठ निलेश काळे व जेठाणी सुनिता काळे यांनी मला शिविगाळ करून म्हणाले की, तुझे पतीचे अंत्यविधीचा केलेला खर्च ६० हजार रूपये आम्हाला दे, मी त्यास पैसे नसल्याचे सांगितले असता जेठ निलेश काळे याने चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.