वडवणी शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम यादव यांचा मृतदेह गणेश विसर्जनाच्या दिवशी तलावात आढळून आला. ही घटना समजताच शहरात एकच खळबळ उडाली असून हा घातपात आहे की आत्महत्या याबाबत विविध चर्चाना ऊत आला आहे. मुळचे अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील असलेले डॉ. शुभम बालाजीनाथ यादव हे १० ऑक्टोबर २०२४ पासून वडवणी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. गणेश विसर्जनाच्या दिवशी सकाळपासून ते बेपत्ता असल्याचे नातेवाईकांनी सांगितले होते.