"तु भांडणे सोडविण्यासाठी का आली नाही?" या कारणावरून झालेल्या वादातून सूनेने सासूवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना डोणज येथे घडली आहे. या प्रकरणात सासू गंभीर जखमी झाली असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गंगाबाई मलकण्णा केदार (वय ६०, रा. डोणज) या व आरोपी सुरेखा दत्तात्रय केदार या सासू-सूना आहेत. दिनांक ८ रोजी सकाळी सुमारास घरासमोर वाद झाला. त्यावेळी आरोपीने "तु भांडणे सोडविण्याकरीता का आली नाही?" असा जाब विचारत शिवीगाळ केली.