राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सिमेंट रस्त्यावर मोठा खड्डा पडल्यामुळे त्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते त्यामुळे आज दि.5 सप्टेंबर रोजी त्या पाण्याच्या डबक्यात खैरी येथील मी माणूस एक सामाजिक संघटनेचे किशोर सोनवणे यांनी झाड हातात घेऊन तो रस्त्यावरील खड्डा बुजविण्यासंदर्भात आंदोलन केलं.