अनुसूचित जमातींसाठीचे आरक्षण टिकविणे आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी जिंतूर शहरात आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सकल आदिवासी समाजाच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा जिंतूर शहरातील मुख्य मार्गावरून प्रचंड उत्साहात मार्गस्थ झाला. मोर्चामध्ये पारंपरिक वेषभूषेत आदिवासी समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. “आरक्षण आमचा हक्क आहे”, “आरक्षणावर गदा येऊ देणार नाही” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला.