कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपालिका क्षेत्र असलेल्या रहिमतपूर नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर एकूण ९ हरकती दाखल झाल्या होत्या. प्रशासकीय पातळीवर या हरकती दाखल करून घेण्यात आल्या असून त्याची सुनावणी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांनी गुरूवारी सकाळी अकरा वाजता नगरपालिका कार्यालयात घेतली.राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार रहिमतपूर नगरपालिकेची प्रभाग रचना प्रशासक तथा मुख्याधिकारी विनोद जळक यांनी जाहीर केली होती.