कात्रज, गुजर निंबाळकरवाडी, खोपडे नगर येथील सोनवणे बिल्डिंगमध्ये आज सकाळी 9:06 वाजता उमेश सुतार यांच्या ओरडण्याने परिसरात खळबळ उडाली. योगेश अर्जुन चव्हाण, अग्निशमन दल, पुणे, यांनी गॅलरीतून पाहिले असता, 4 वर्षीय भाविका चांदणे ही तिसऱ्या मजल्यावरील बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पडण्याच्या स्थितीत अडकली होती. योगेश तात्काळ तिसऱ्या मजल्यावर पोहोचले, तेव्हा घराला कुलूप असल्याचे दिसले. भाविकाची आई शाळेतून परत येताच दरवाजा उघडला आणि योगेश यांनी मुलीला खिडकीतून सुखरूप घरात खेचले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे भाविकाचा जीव वाचला. परिसरात योगेश यांच्या धैर्याचे कौतुक होत आहे.