हिवरा नदीत पात्रात पाय घसरल्याने 16 वर्षीय मुलगी वाहून गेल्याची धक्कादायक घटना आज दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे,, पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक परिसरात असलेल्या हिवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला असून याच गावातील महिलेचा व तिच्या सोबत असलेल्या सुमारे 16 वर्षीय मुलीचा शेतातून येत असताना पाय या नदी पात्रात घसरला, सुदैवाने महिलेस वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले मात्र निकिता पाण्यात वाहून गेली आहे, निकिताला शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सूरु आहे,