आज दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या दरम्यान नांदेड शहराजवळच्या वाजेगाव पुलांवरुन गोदावरी नदीचे पाणी वाहत आहे . आणि या पुराच्या पाण्यात दोन तरुण स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडियो व्हायरल झाला. गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे . वाजेगाव जवळ हा बंधारा आहे .. या पुलावरून पाणी वाहत आहे .. पुराच्या पाण्यात वाळू काढन्यासाठी असलेले तराफे पकडण्यासाठी हे तरुण पाण्यात उतरले. समाज माध्यमावर प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी तातडीने त्या दोन्ही तरुणाना ताब्यात घेतले