नांदणी गावात भुरट्या चोरट्यानी धुमाकूळ घातला असून वारंवार होणाऱ्या चोऱ्यांच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान मोर्या चौक परिसरातून चिदानंद कल्लाप्पा तेरदाळे (वय 38, व्यवसाय ड्रायव्हिंग,रा. मोर्या चौक, नांदणी यांच्या घरासमोरून त्यांच्या स्प्लेंडर प्लस मोटरसायकलची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे.ही घटना 3 सप्टेंबर रोजी रात्री 12 गुरुवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान घडली आहे.