सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल टर्निंग पॉईंट येथे जेवणाचे बिल मागण्याच्या कारणावरून नऊ जणांनी मिळून वेळूच्या काठ्यांनी पिता-पुत्रांसह पुतण्याला जबर मारहाण केली. तसेच हॉटेल मालकाचा गळा दाबला. त्यानंतर हॉटेलच्या व्हरांड्यातील सीसीटीव्ही कॅमेरे, मोबाइल, टेबल-खुर्थ्यांची तोडफोड करून आरोपींनी धूम ठोकली. याबाबत नारायण हरिदास शिंदे (रा. मांजरी) यांनी रविवारी या घटनेची नोंद सांगोला पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.