महाराष्ट्रात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अकोल्याच्या दहिगाव गावंडे शिवारात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सततच्या पावसामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून एका झाडाला १५ ते २० बोंड किडल्याचे दिसून येत आहे. हजारो रुपये खर्च करूनही कीटकनाशकांचा परिणाम झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.