नटराज गार्डन समोरील एका मेडिकल दुकान एजन्सीला मोठी आग लागल्याची घटना ७ सप्टेंबर रोजी सकाळी ४.३० वाजे दरम्यान घडली. या आगीत औषधी साठा तसेच इतर साहित्य जळून खाक झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की, खामगाव शहरातील नटराज गार्डन समोर जैन फार्मा मेडिकल एजन्सी नावाने दुकान असून या औषधीच्या दुकानाला मोठी आग लागली. या घटनेची माहिती नगरपरिषद अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी गाठून आग विझविण्याचे प्रयत्न केले. या आगीत दुकानातील औषधीचा साठा तसेच इतर साहित्य जळून नुकसान झाले.