रायपूरा शिवारात 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शेतातील मोटारपंपाची वायर चोरी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी गावकऱ्यांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. फिर्यादी विजय देवीदास भूजाळे (वय 54, रा. सरमसपूरा) यांच्या शेतातील मोटारपंपाचे 40 फुट केबल वायर किंमत सुमारे 4 हजार रुपये तसेच नितीन प्रभाकर टोंगडे यांच्या शेतातील 45 फुट केबल वायर किंमत सुमारे 4 हजार 500 रुपये असा मिळून एकूण 8 हजार 500 रुपयांचा माल आरोपीने चोरून पळून जात असताना शेतकऱ्यांनी त्याचा पाठलाग करून