गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा चामोर्शी - हरणघाट - मूल मार्ग सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दररोज या मार्गावरून ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनधारकांना व प्रवाशांना या खड्डेमय रस्त्यामुळे अपघाताचा धोका कायम निर्माण झाला आहे.