तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे आज दि. 5 सप्टेंबर रोज शुक्रवारला दुपारी 12 वा. भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष तथा भाजपचे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र प्रमुख इंजि. प्रदीप पडोळे यांच्या हस्ते ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामीण महिला सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी व गावातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.