आगामी सण उत्सव अनुषंगाने औंढा नागनाथ येथील पोलीस ठाणे मैदान येथे दिनांक २२ ऑगस्ट शुक्रवार रोजी सकाळी साडेआकरा वाजता दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेण्यात आली दरम्यान जमलेला जमाव पांगवण्यासंदर्भाने अश्रुधूराच्या नळकांड्या,सेल फोडत प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक जीएस राहिरे, आरएसआय बाबुराव जाधव, कवायत निर्देशक रामराव जाधव,सहायक पोलीस निरीक्षक कैलास भगत, पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे, सह कर्मचारी उपस्थित होते