गणेशोत्सवाचा समारोप करताना वर्धा शहरातील नागरिकांनी दिनांक 6 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजतापसून भक्तिभावाने बाप्पांना निरोप दिला. घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मूर्तींचे पूजाअर्चा करून विसर्जन करण्यात आले.नगरपालिका व सामाजिक संघटनांच्या वतीने शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यावरणपूरक निर्मळ गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर कृत्रिम कुंडांचा वापर केला.