इचलकरंजी शहरातील शहापूर परिसरात कामगारांच्या वादातून एका कामगाराची निर्घृण हत्या झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहापूर पोलिसांनी तिघा आरोपींना अटक करून आज शुक्रवार दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.मृत संतोष गोपाल पांडा (वय 38, सध्या रा. विनायक हायस्कूल समोर, शहापूर, मूळ रा. ओडिशा) हे बालासा उद्योग समूहात काम करत होते.