अकोल्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..या प्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांकडून विशेष पथक तयार करण्यात आले आहे. दरम्यान आरोपीला अटक करावी यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी ठाणेदारांना निवेदन दिलं आहे.