सहायक व्यवस्थापकाविरुद्ध अश्लील भाषेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका महिला सुरक्षारक्षकासोबत अश्लील संभाषण केल्याप्रकरणी जयप्रकाश नामदेव इंगळे रा.जळगाव जामोद, बुलडाणा या सहायक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेब्रुवारी २०२५ ते २६ ऑगस्ट २०२५ दरम्यान त्याने महिलेला मोबाईलवर अश्लील भाषेत संवाद साधून मानसिक त्रास दिला. पीडित महिलेने २९ ऑगस्ट रोजी पोलिसांत तक्रार दिली असून, खदान पोलिसांनी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.