शारदीय नवरात्र उत्सव काळात तुळजाभवानी देवीचे व्हीआयपी दर्शन महागणार आहे.व्हीआयपी दर्शनाच्या पासच्या किमतीत वाढ करण्यात आली असुन 20 सप्टेंबर पासून नवे दर लागू होणार आहेत अशी माहिती मंदीर संस्थानच्या वतीने दि.13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.दोनशे रुपयांचा देणगी दर्शन पास तीनशे रुपयांना मिळणार, तर पाचशे रुपयांच्या देणगी दर्शन पासची किंमत 1000 रुपये असणार आहे.तसेच स्पेशल गेस्ट रेफरल पासची किंमत ही दोनशे रुपयावरून वाढ होऊन पाचशे रुपये करण्यात आली आहे.