आज पाच ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनोखी बॅनरबाजी केली आहे. विशेष म्हणजे त्या बॅनरवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सुप्रिया सुळे यांचा फोटो लावलेला आहे. हा बॅनर येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे,तसेच या बॅनरची सर्वत्र चर्चा होताना पाहायला मिळत आहे.