एका युवकास चौघांनी मारहाण केल्याची घटना पहुरजिरा येथे २६ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजे दरम्यान उघडकीस आली आहे. याबाबत गोपाल मुरलीधर गावंडे, वय २५ वर्षे पहुरजिरा याने जलंब पोलीस स्टेशनला तक्रार दिली की,सचिन मधुकर डोंगरे,विठ्ठल बुंदे,प्रकाश संदीप दिघडे, सागर बुंदे यांनी संगनमत करून शिवीगाळ करून मारहाण केली व धमकी दिली. अशा तक्रारीवरून जलंब पोलिसांनी सचिन मधुकर डोंगरे,विठ्ठल बुंदे,प्रकाश संदीप दिघडे, सागर बुंदे सर्व रा. पहुरजिरा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.