हाफिज आजम खान यांची एआयएमआयएम अकोला जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्या आदेशानुसार झाली. खान यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्या सक्रिय नेतृत्वामुळे अनेक युवकांनी पक्षात प्रवेश केला असून, अकोला जिल्ह्यात एआयएमआयएमची ताकद वाढली आहे. संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले.