मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाणे हद्दीत येत असलेल्या मौजा गायमुख येथे दि. 22 ऑगस्ट सायं.5 वा.च्या सुमारास आंधळगाव पोलिसांनी दारू विक्रेता संजय बेनिराम कोडवते याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील 40 लिटर हातभट्टीची दारू असा एकूण 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपी दारु विक्रेत्या विरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.