बारु गावातील तलाव आज मंगळवार सकाळी १० वाजता फुटल्याने शेत व गाव जलमय झाले असून रस्त्यावर पाणीच पाणी असल्याने वाहतूक कोंडी झाली आहे.तालुक्यातील बारु गावाजवळील तलाव सकाळच्या सुमारास फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरल्याने शेतातील पिके नष्ट झाली त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर गावात सुद्धा पाणी शिरल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आणि रस्त्यावर पाणीच पाणी असल्याने ढाकणा,अकोट,धारणी दोन्हीकडची वाहतूक बंद झाली आहे