जळगावच्या पाचोरा तहसील कार्यालयात खरीप हंगामातील नुकसानभरपाई अनुदानाच्या तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सहायक लिपिक अमोल सुरेश भोई आणि प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण यांनी बनावट याद्या तयार करून पात्र नसलेल्या तसेच शेती नसलेल्या व्यक्तींच्या नावावर रक्कम नोंदवून ती काढून घेतल्याचा आरोप आहे. हा घोटाळा शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर उघडकीस आला. आंबेवडगाव तलाठी यांनी लाभार्थ्यांची यादी चावडीवर टाकली असता नावे व आधार क्रमांक वेगळे होते.