मोताळा तालुक्यातील पिंपळगाव नाथ येथील २५ वर्षीय विवाहितेने चारित्र्यावर संशय घेऊन सासरच्या छळाला कंटाळून २१ ऑगस्ट रोजी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मृतक महिलेचे नाव मीना दादाराव शिंदे असे आहे.याप्रकरणी प्रदीप गंगाराम झिटे यांनी २२ ऑगस्ट रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पती दादाराव शिंदे, विजय शिंदे, साखराबाई शिंदे आणि चिमा गजानन शिंदे विरुद्ध बोराखेडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.