राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्याविरुद्ध वादग्रस्त विधान केल्याबद्दल भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरुद्ध जयंत पाटील यांचे आजोळ असलेल्या चरेगाव येथील ग्रामस्थ आणि उंब्रज पंचक्रोशीतील राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शनिवारी सायंकाळी पाच वाजता वाजता उंब्रज येथील पाटण-पंढरपूर राज्यमार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी आ. पडळकर यांचा निषेध करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.