पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या स्थलांतराला अखेर केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्याबाबतची माहिती वन विभागाकडून शनिवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उपलब्ध झाली. मंत्रालयातील वन्यजीव विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुरभी राय यांनी राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव यांना याबाबत पत्र पाठवले. या पत्रात ताडोबा-अंधारी व पेंच व्याघ्र प्रकल्पातून आठ वाघ जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे.