कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 3.2 मिमी पाऊस झाला असून गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 23.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.