स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज मंगळवारी 26 ऑगस्ट दुपारी 3 वाजता सोमठाण येथे भेट देऊन परिसरातील शेतीपिकांचे झालेले प्रचंड नुकसान प्रत्यक्ष पाहिले.मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णतः उध्वस्त झाली आहेत.सोयाबीन,उडीद आणि कापूस या मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.शेट्टी यांनी नुकसानीची पाहणी करताना शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.