भंडारा जिल्ह्यातील कुर्झा येथील हितेंद्र पुरुषोत्तम गजभिये वय 49 वर्षे हा दिनांक 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता दरम्यान पवनी येथे बाजार आटोपून कुर्झा येथे आपल्या गावी सायकलने जात असताना आरोपी क्रेन वाहन क्रमांक एम एच 34 सीजे 4270 च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगईने व निष्काळजीपणे चालवून सायकलला धडक दिली. यात हितेंद्र याच्या पायाला पोटाला व कमरेला मार लागून गंभीर जखमी झाला व आरोपी वाहन चालक हा घटनास्थळावरून पसार झाला. अपघाताची माहिती पवनी पोलिसांना मिळताच जखमीला उपचाराकरिता...