हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव पोलीस स्टेशन अंतर्गत एका गावामध्ये अल्पवयीन मुलीस फुस लावुन पळविल्याची घटना घडली असून याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलीस पळवणाऱ्या एका तरुणासह त्याला मदत करणाऱ्या दोन मित्रावर सेनगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील सर्व फरार आरोपींचा पोलिसांच्या वतीने शोध सुरू आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 14 जून रोजी दुपारी 4 वाजता प्राप्त झाली आहे.