भंडारा तालुक्यातील मौजा कवडसी येथील हनुमान मंदिरात दि. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान श्रावण मास समाप्ती निमित्ताने भजन कार्यक्रम घेण्यात आला. तसेच यावेळी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सभापती जिल्हा परिषद भंडारा प्रेम भाऊ वनवे व सेवानिवृत्त सैन्य जवान योगेश रोडगे यांनी गुरुदेव सेवा भजन मंडळ कवडसी यांना विना व हार्मोनियम भेट दिली. यावेळी भजन मंडळातील सदस्य चिंधू वनवे, डाकराम कारेमोरे, सुखदेव निंबार्ते, सचिन सदावर्ती, सुनील राखडे, गोलू बोधनकर, भूपेश ढोरे, अरुण सांडेल व अन्य हजर होते.