३६ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना जयपुर लांडे येथे ३० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे.पोलिसांनी तक्रारीवरून हरवल्याची नोंद केली आहे. जयपुर लांडे येथील किसन कनिराम पाखरे वय ३६ वर्षे हे घरून निघून गेले उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्याचा नातेवाईकांनी नातेवाइकांकडे व सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच मिळून आले नाही. यामुळे याबाबत पत्नी सौ. कविता किसन पाखरे यानी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची नोंद केली.