शहरातील मांडळ शिवारात अनाथ मतीमंद मुला-मुलींच्या बालगृहात राहणाऱ्या अनाथ 23 वर्षीय मतिमंद युवकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 9 जुलै रोजी 9 वाजेच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.बंगाली एन के वय 23 रा.अनाथ मतीमंद मुला-मुलींच्या बालगृह,मांडळ शिवार शिरपूर असे मयत युवकाचे नाव असून याप्रकरणी अनाथ मतीमंद मुलांचे बालगृहाचे लिपिक विवेक वाघ यांनी शहर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.पुढील तपास पीएसआय संदीप दरवडे करीत आहे.