तालुक्यात तथा जिल्ह्यात गेल्या महिणाभर झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असुन त्याचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.त्यामुळे यातून त्याला सावरण्यासाठी प्रती हेक्टर एक लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर करुन रक्कम त्यांच्या खात्यात जमा करावी असे निवेदन शिवसेना ऊबाठा जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे तहसील कार्यालयात सादर करण्यात आले. याशिवाय इतर मागण्याही सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे.