नवी मुंबईच्या कोरवे गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीवर चाकूने सपासप वार करत तिची निर्गुण पणे हत्या केली. नांदायला येत नसल्याच्या कारणावरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. प्रकरणी मयत ज्योती काकडे चा पती आरोपी राजू काकडे याला एन आर आय सागरी पोलिसांनी अटक करून 4 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.