बिबवेवाडी पोलिसांनी गस्ती दरम्यान केलेल्या कारवाईत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूसासह एका तरुणाला रंगेहात पकडण्यात आले.आरोपीचे नाव अतुल सुनील चव्हाण (वय २६, रा. बिबवेवाडी) असे आहे. पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे व विशाल जाधव यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने संत निरंकारी सत्संग भवनाजवळ ही कारवाई करण्यात आली