निंबोणी (ता. मंगळवेढा) येथे पाणी पिण्याचा बहाणा करून दोन चोरट्यांनी ७२ वर्षीय वृद्ध महिलेला लुटल्याची घटना घडली आहे. या घटनेत चोरट्यांनी तिच्या गळ्यातील अंदाजे ८० हजार रुपये किमतीचे दागिने हिसकावून नेले. या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गिरजाबाई पांडुरंग खांडेकर (वय ७२, रा. निंबोणी) या ५ सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास आपल्या घरासमोरील अंगणात पतीसमवेत झोपल्या होत्या.