भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भास्कर ताजणे हे सभापती पदावरुन पायऊतार झाल्यानंतर बाजार समितीच्या पार पडलेल्या सभापती पदाच्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे हे विजयी झाले आहेत. १८ संचालक असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत राजेंद्र डोंगे यांना १३ तर विरोधी उमेदवार ज्ञानेश्वर डुकरे यांना ५ मते प्राप्त झाली.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून चंद्रशेखर बोदड यांनी काम पाहिले. राजेंद्र डोंगे यांचे सभापती झाल्याबद्दल अभिनंदन होत आहे.