तुमसर शहरातील विनोबा नगर येथील रहिवासी फिर्यादी लिमन राजेश नावटकर वय 26 वर्षे या युवकाच्या मोबाईलवर आरोपी मोबाईल धारक यांचे आरवनंदा या नावाने इंस्टाग्राम आयडीवर आयफोनच्या ऑफर दिला होता.यावेळी आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलवर वारंवार संपर्क करून फिर्यादीच्या स्टेट बँक ऑफ इंडिया खात्यामधून 24 हजार रुपये लंपास केले. सदर घटना 20 ऑगस्ट रोज बुधवारला सकाळी 11 वा.च्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.