सोलापूर ग्रामीण पोलीस दलाने अंमली पदार्थविरोधी जनजागृती अभियानानंतर विशेष कारवाई करत मोठा पर्दाफाश केला आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १३ ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यान जिल्ह्यात अंमली पदार्थांविरुद्ध जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. शाळा, कॉलेजमध्ये समुपदेशन, शपथविधी, रॅलीसारख्या कार्यक्रमांतून नागरिकांना गांजा, इतर अंमली पदार्थांविषयी जागरूक करण्यात आले. तसेच नागरिकांनी संशयित माहिती पोलीसांना देण्याचे आवाहन करण्यात आले.