शिरोळ नगरपालिकेमार्फत सहा महिन्यांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांचे निब्रिजीकरण करण्यात आले असले,तरी या मोहिमेचा प्रत्यक्षात काहीही परिणाम दिसून येत नसल्याचे चित्र आहे.शहरात पुन्हा नव्या पिलांचा जन्म होत असून भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.यामुळे पालिकेचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून निब्रिजीकरणाच्या कामाबाबत गंभीर त्रुटी झाल्याचे स्पष्ट होत आहे.शाहूनगर वसाहतीसह गावातील विविध भागांत मोठ्या प्रमाणावर भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे.