लातूर -लातूरच्या डॉक्टर रामेश्वरी आलाबोधे यांच्या अंजनी प्रोडक्शनचे "माझ्या गणा" हे गाणे संपूर्ण महाराष्ट्रभर गणेश उत्सवामध्ये सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झाले आहे. मनमोहक बोल, आकर्षक संगीत आणि उत्तम कोरिओग्राफीमुळे हे गाणे लोकांच्या पसंतीस उतरले आहे. विशेष म्हणजे अल्पावधीतच हे गाणे लहान मुलांमध्येही प्रचंड लोकप्रिय झाले असून विविध ठिकाणी या गाण्यावर मुले-मुली नृत्यसादरीकरण करताना आज दिनांक 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दिसून आले.